उद्योजकतेचे शिक्षण
सध्याची युवकांची स्थिती फार गंभीर आहे. कोट्यवधी युवक बेरोजगार आहेत . दहावी-बारावी जेमतेम पास - नापास किंवा त्यापेक्षाही कमी शिक्षण, रोजगाराचे कोणतेही कौशल्य माहीत नाही . शेतीची कामेही येत नाहीत . शिक्षण चालू ठेवता येत नाही . उद्योगाचे शिक्षण नाही . अशा विचित्र कात्रीत आज युवक सापडला आहे . याचे परिणाम फार गंभीर होत आहेत. केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक दृष्टीनेही याकडे पाहिले पाहिजे. समाजातील युवक असे निराश, हतबल युवक असणे योग्य नाही. समाजातील जाणत्या लोकांनी एकत्र येऊन या बाबतीत विचार आणि कृती केली पाहिजे.
अशा युवकांसाठी उद्योजकतेचे शिक्षण व्यापक प्रमाणावर सुरु केले पाहिजे. हे शिक्षण सहजपणे उपलब्ध झाले पाहिजे. केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण परिसराला पूरक अशा उद्योगांचे असे शास्त्रशुद्ध शिक्षण युवकांना जवळच्या परिसरात मिळेल अशी व्यवस्था करायला हवी.
यामध्ये युवतींचाही समावेश करायला हवा.

No comments:
Post a Comment